पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

0
104

पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दि.14) काळेवाडी रागा पॅलेस हॉटेल जवळ झाला आहे.

याप्रकारे रवींद्र मुरलीधर सुतार (वय 48 रा. पिंपळे गुरव). यांनी वाकड पोलिसांनी फिर्याद दिली आहे. यावरून अब्दुल रहीम खान (वय 22 रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात रघुनाथ बाबुराव पंडित (वय 75 रा.काळेवाडी) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ पंडित हे पायी जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून पंडित यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात पंडित यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावरून वाकड पोलिस ठाण्यात विरोधात होणार दाखल करण्यात आला आहे.