पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

75

भोसरी, दि. २५(पीसीबी) -पायी जाताना मोबाईल फोनवर बोलत जाणा-या व्यक्तीचा मोबाईल फोन दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली.

अजितकुमार दयाराम पाल (वय ३४, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी मोबाईलवर बोलत रस्त्याने चालत जात होते. ते एमआयडीसी भोसरी मधील संकेत हॉटेल येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातून सात हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.