पादचारी वृद्धाला तिघांनी लुटले..

298

निगडी, दि. १६ (पीसीबी) – रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाला तिघांनी लुटले. वृद्धाकडील ३८ हजार ७०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी काढून नेली. ही घटना ६ जुलै रोजी रात्री ओटास्कीम परिसरात घडली.शिवाजी सुभान साबळे (वय 85, रा. ओटास्कीम निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौत्या ऊर्फ गौतम शिंदे (रा. ओटास्कीम, निगडी) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सोमेश्वर मंदिर चौकातील टपरीवरून विडी खरेदी केली आणि पायी घरी निघाले. संजयनगर ते राजनगर चौक दरम्यान बोळीतून जात असताना आरोपींनी पाठीमागून येऊन त्यांना अडवले. फिर्यादी यांच्या खिशातून ३८ हजार ७०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.