पादचारी तरुणाचा मोबाईल पळवला

62

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पादचारी तरुणाच्या हातातून मोबाईल फोन हिसकावल्याची घटना रविवारी (दि. 2) रात्री मोहननगर चिंचवड येथे गायवासरू चौक ते बसवेश्वर चौकादरम्यान घडली.

निलेश सुरेश कुदळे (वय 18, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या मित्रांसोबत गायवासरू चौक ते बसवेश्वर चौकादरम्यान पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील पाच हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.