पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० वर घरमालकांचे नळ तोडले

0
106

दि 2 एप्रिल (पीसीबी ) – गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच करवसुली व करसंकलन विभागाच्या माध्यमातून पाणीपट्टी वसूल करण्यात आली. सरत्या आर्थिक वर्षात ७८ कोटी ५७ लाखांची पाणीपट्टी वसूल झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा एक लाख ७६ हजार अधिकृत नळजोडधारक आहेत. महापालिकेला पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. थकबाकीही वाढत होती. एकीकडे मालमत्ता करातून दिवसेंदिवस उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. राज्यातील काही पालिकांमध्ये पाणीपट्टी वसुली आणि करवसुलीचे एकत्रित कामकाज चालते. त्या महापालिकांचा पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाने अभ्यास केला. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून पहिल्यांदाच करसंकलन आणि पाणीपट्टी एकत्र वसूल करण्याचा निर्णय यांनी प्रशासनाने घेतला. त्यानुसार करसंकलन विभागाने पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू केली.