पहाटेच्या वेळी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
253

पिंपळे निलख , दि. १९ (पीसीबी) – पहाटे उद्यानात चालण्यासाठी गेलेली महिला घरी येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. १८) पहाटे पावणे सहा वाजताच्या सुमारास गणेशनगर, पिंपळे निलख येथे घडली.

याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी पहाटे घराजवळील उद्यानात चालण्यासाठी गेल्या होत्या. चालून झाल्यानंतर त्या उद्यानातून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.