पहाटेच्या वेळी पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

PCB Admin
1 Min Read

सांगवी, दि.१९ (पीसीबी)- पादचारी महिलेचे तीन चोरट्यांनी एक लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. १८) पहाटे पावणे सहा वाजता पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी महिलेने तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरापासून रस्त्याने चालत जात होत्या. त्यावेळी तीन मुले एका दुचाकीवरून आली. दुचाकीवर मध्ये बसलेल्या मुलाने फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article