पवारांना डिवचल्यावर काय होतं, हे आता त्यांना समजेल

0
290

डोंबिवली, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीमध्ये हात घालून त्यांनी शरद पवार यांना डिवचले आहे. पवारांना डिवचल्यावर काय होतं, हे आता त्यांना समजेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील विकास कामांवरून इथली जनता नाराज आहे असे सांगत अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. शिंदे यांना देखील लक्ष केले.

कल्याण दौऱ्या दरम्यान उल्हासनगर येथील पप्पू कलानी यांची रोहित यांनी भेट घेतल्याने देखील एकच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने कल्याण मधील स्प्रिंग टाईम सभागृहात आमदार रोहित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, जिल्हा अधिक्षक सचिन पोटे, विकास लवांडे, वंडार पाटील, सचिन बासरे, रवी कपोते, अंकुश जोगदंड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रोहित पवार कल्याण मध्ये लोकलचा प्रवास करून आले.
आपल्या भाषणाची सुरवातच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडी यावर झोड घेत केली. बांद्रा वरून निघालो तेव्हा फार जोश मध्ये होतो. गुगल मध्ये पाहिलं किती वेळ लागेल, तेव्हा समजलं साडे 3 तास लागतील. मग लोकलचा पर्याय निवडला. एककिडे एसी गाडी होती निवांत बसून येता आलं असत, जस सरकार आहे आताच. तर दुसरीकडे प्रवासात संघर्ष होता. तो संघर्ष मी निवडला. लोकांच्या हितासाठी लढायचं अशी ही लोकल आम्ही निवडली.
लोकल ने येत असताना ठाणे, कल्याण येथील नागरिक भेटले. त्यांनी आमच्याशी संवाद साधताना सांगितले, आमच्या भागात मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री यांचे सुपुत्र येथील खासदार आहेत. पण विकासाच्या बाबतीत बघितले तर त्या लेव्हलचा विकास कुठेही होताना दिसत नाही, असं लोक बोलतात.