पवारांची बारामती हादरली! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये चाकू खुपसून विद्यार्थ्याचा खून

0
46

दि. ३० (पीसीबी) – विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आज बारामतीमध्ये दिवसाढवळ्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा खून झाला आहे. या घटनेमुळे बारामती हादरून गेली आहे. बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रांगणात खून झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
बारामतीमध्ये घडला धक्कादायक प्रकार :

बारामतीच्या नामांकित अशा टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेत दोन विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून आणि चाकू खुपसून एका तरुण विद्यार्थ्याचे आयुष्य संपवण्यात आले. अथर्व पोळ असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तसेच अथर्व हा ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता.

या खूनप्रकरणी ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आता या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र हा खून का करण्यात आला? याची माहिती अद्याप मिळाली नाही.

बारामतीमध्ये दिवसाढवळ्या खून होत असताना तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये देखील वर्दळ असताना सुद्धा या घटनेतील विद्यार्थ्याच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही. त्यामुळे बारामतीमध्ये माणुसकीच हरवून गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची, शिक्षकांची तसेच सुरक्षारक्षक सुद्धा ये जा करत असतात. मात्र, त्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत असताना देखील कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.