पवना धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

55

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने आज (शुक्रवारी) सकाळी आठ वाजल्यापासून धरणातून 3500  क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक राहण्याचे आवाहन पाठबंधारे विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या मध्यापासून जोरदार हजेरी लावली. धुंवाधार पाऊस पडला.  त्यामुळे धरणातील येवा वाढला. अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पवना धरण परिसरात पावसाने हजेरी लावली. मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी आठ वाजल्यापासून धरणाच्या वीज र्निमिती संचाद्वारे 1400 तर सांडव्यातून 2100 असे 3 हजार 500 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व येणारा येवा यांचे प्रमाण बघुन धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल.
त्यामुळे पवना नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाठबंधारे विभागाने केले आहे.