परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान

0
214
  • वृध्द आई वडिलांचा सांभाळ करणाऱ्या लेकिंचा होणार गौरव

महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे यांच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त दहा मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्राधिकरण चिंचवड सावरकर भवन मध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमची मुलं सुरक्षित आहेत का या विषयावर प्रख्यात व्याख्याते पत्रकार सुशील कुलकर्णी यांचं व्याख्यान आयोजित केले आहे.

ब्राह्मण मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदतसुध्दा या कार्यक्रमात जाहीर केली जाणार आहे. मातृकन्या कौतुक सोहळा या अंतर्गत माझी मुलगी माझा अभिमान ..ज्या एकुलत्या एक मुली आपल्या आई-वडिलांचा त्यांच्या म्हातारपणी त्यांचा संभाळ करत आहेत अशा काही प्रतिनिधी स्वरूपावर मुलींचा कौतुक सोहळा या कार्यक्रमात आयोजित करण्यात येणार आहे.

सर्व तरुण मुलं व मुलींना आग्रहाचे आमंत्रण असल्याचे संयोजकांना कळविले आहे. प्रदेश अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी, शर्मिला महाजन (प्रदेश सचिव ), मंजिरी सहस्त्रबुद्धे (प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष ), डॉ. शर्वरी यरगट्टीकर (पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष ) सुभाष फाटक (प्रदेश कार्यकारणी सदस्य ), स्मिता येवलेकर (प्रदेश कार्यकारणी सदस्य ), अश्विनी मेहरुणकर(प्रदेश कार्यकारणी सदस्य ) अभय ओरपे, अनिल कुलकर्णी आदींनी आयोजन केले आहे.