परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत १५ मे ला महासत्संग मेळावा

0
168

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ मे २०२४ ला सनीज वर्ल्ड, पाषाण-सुसगाव रोड , सुसगाव, पुणे येथे महासत्संग मेळावा संपन्न होत आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर – एक धर्मार्थ ट्रस्ट सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात सेवामग्न आहे. नाशिक शहरापासुन 25 किलोमीटर दूर दिंडोरीहुन गेल्या सात दशकांपासून सामाजिक सुधारणेसाठी सेवामार्ग निरंतर जमीनीस्तरावर कार्यरत आहे. व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, बिना-हुंडा सामूहिक विवाह, कृषि विकास, सांप्रदायिक सद्भाव, बालसंस्कार अश्या विविध विनामूल्य यशस्वी उपक्रमांसह दिंडोरी येथून सुरु झालेला सामाजिक विकासाचा हा राजमार्ग आता हजारों सेवाकेन्द्रांच्या माध्यमातुन विश्वशांतीचा संदेश देत भारतीय परम्परा आणि संस्कृति चा गौरव संपूर्ण विश्वात प्रसारित करत आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आज सेवामार्गाचे सुमारे ७००० हुन अधिक सेवा केंद्र भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तरप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडु, केरळ, असे विविध राज्य आणि नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, यूरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, ऊमान, अश्या विविध देशांमध्ये कार्यरत आहे.

सेवामार्गचे सर्व कार्यक्रम लाखो निःस्वार्थ आणि समर्पित स्वयंसेवक सेवेकऱ्याद्वारे विनामूल्य आणि नियमितपणे चालवले जातात आणि मुख्य म्हणजे या सर्व स्वयंसेवक सेवेक-यांनी स्वतः या विविध कार्यक्रमांचा अनुभव आणि लाभ घेतला आहे आणि ते या सेवा जात, पात किंवा धर्म विचारात न घेता, कोणताही भेदभाव न करता समाजातील सर्वात खालच्या स्तरापर्यंत पोहोचवन्यासाठी कार्यरत आहे, हे सर्व परमपूज्य गुरुमाऊलींच्या सक्षम मार्गदर्शन आणि निस्वार्थ प्रेमामुळेच शक्य आहे.या सर्व कार्यक्रमांचा आणि प्रशिक्षणांचा उद्देश पुढची अशी पिढी निर्माण करणे कि ज्यांना आपल्या संस्कृतीवर गर्व आहे, दृष्टी विज्ञानिक आहे, आणि भविष्याचा सामना करण्यासाठी मन – बुद्धी तयार आहे.

परमपूज्य गुरुमाऊली गेली ४५ वर्षे “ग्राम आणि नागरी विकास अभियान” च्या माध्यमातून समाजातील दु:खी पिडीत लोकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ग्राम आणि नागरी विकास अभियानात १८ विभागाच्या द्वारे ज्यात गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, कृषी, विवाह संस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तुशास्त्र, वेद विज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन, पशु व गौवंश संवर्धन, स्वयंरोजगार, भारतीय संस्कृती, कायदा जागरूकता, आरोग्य आणि आयुर्वेद, आयटी विभाग, प्रशिक्षण विभाग, देश विदेश अभियान विभाग, आणि प्रशासकीय विभाग यांचा समावेश आहे.

या सर्व उपक्रमांचा परिणाम म्हणून आज लाखो लोक व्यसनमुक्त, निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत. परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागातील सेवेकरी तरुणांना करिअर समुपदेशन करणे, स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करणे, महिलांसाठी बचत गटांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देने, गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार शिबिरे आयोजित करने, आशा सेवक आणि मातांसाठी शिशु संस्कार प्रशिक्षण देतात, पालकांसाठी पालकत्व मार्गदर्शन, शिक्षक मांदियाळी, विद्यार्थ्यानसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, शेतक -यांसाठी बांधावर जाऊन विविध मार्गदर्शन, वृक्ष लागवड व संवर्धन, दुर्ग संवर्धन, नदी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, अन्नदान, वस्त्रदान,आरोग्य शिबिरे, दुष्काळ व पूर स्थितीत मदत कार्य, प्रत्येक वर्षी १ कोटी वृक्ष लागवड, सेंद्रिय – नैसर्गिक आणि आध्यात्मिक शेती मार्गदर्शन, सामूहिक विवाह समारंभ, रोगनिदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन, आदिवासी व अतिमागास भागात चालते फिरते रुग्णालय व एम्बुलंस, आदी विविध सामाजिक उपक्रम सतत राबवत असतात.

​परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुपीठाने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, बंगाली, संस्कृत, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये १०० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. सर्व मुद्रण साहित्य आज भारतासह विविध देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाचले जातात. बालसंस्कार पाठयक्रम हा ग्रंथ नेपाळी भाषेत देखील प्रकाशित केला गेला असून नेपाळ मध्ये तो पाठयक्रमात देखील समाविष्ठ केला आहे. वैदिक ग्रंथांमधील विविध ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे आहे, यासाठी विविध संशोधन करण्यासाठी देखील वैदिक विज्ञान अनुसंधान विभाग अंतर्गत विविध संशोधन कार्य परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे, कैन्सर वर उपाय म्हणून आयुर्वेदिक सप्तरंगी काढा यावर संशोधन, तसेच नुकताच आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल मध्ये प्रकाशित झालेला प्रज्ञाविवर्धन स्तोत्रावरील शोधनिबंध हे काही महत्वपूर्ण लोकाभिमुख संशोधन कार्य आहे.

महामारीच्या काळात देखील परमपूज्य गुरुमाऊली अथक परिश्रम करत होते. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली, सेवामार्गच्या सर्व सेवा केंद्रातील स्वयंसेवकांनी सॅनिटायझर, मास्क, रेशन किट, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, वस्त्रदान आणि इतर आवश्यक वस्तू यांची मदत गरजूंना केली. यासोबतच अनेक गावांमध्ये वैद्यकीय शिबिरेही आयोजित करण्यात आली असून कोविड बाधित कुटुंबांना मोफत उपचार व समुपदेशन करण्यात आले. श्रीगुरुपीठाने स्थापन केलेले सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि सेवेकरी निवास हे कोविड सेंटरसाठी सरकारला मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.

कोविड महामारी दरम्यान चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचंड नकारात्मक परिणाम होत राहिला. एकटेपणामुळे मुले, प्रौढ आणि वृद्धांसाठी वेदनादायक स्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली महामारीमुळे उद्भवलेल्या मानसिक असंतुलनावर मात करण्यासाठी मंत्रक्रिया ध्यान योग हे विशिष्ट ध्यान तंत्र तसेच विविध दैनिक सेवा डिजिटल माध्यमाद्वारे भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई सह विविध देशात उपलब्ध करून देण्यात आल्या. हा उपक्रम अनेकांना मानसिक समस्या आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरला.

परमपूज्य गुरुमाऊली यांच्या सामाजिक क्रांती मोहिमेचा विस्तार म्हणून, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे मल्टी स्पेशालिटी सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या रूपाने उचललेले एक पाऊल येत्या काही दशकात एक मोठी उपलब्धी ठरणार आहे. सर्वांसाठी कमी खर्चात वैद्यकीय उपचार आणि निरोगी जीवन जगण्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे.

परमपूज्य गुरुमाऊलींनी सुरू केलेल्या या नि:स्वार्थ-शांत सामाजिक क्रांतीची अनेक संस्थांनी दखल घेतली आहे आणि आपणास विविध पुरस्कार आणि उपाधी देऊन सन्मानित केले आहे. भारत महोत्सव २०२१ – निमित्त झुरिच (स्वित्झर्लंड) येथे गुरुमाऊलींना दिलेला सर्वात प्रतिष्ठित ‘भारत गौरव’ पुरस्कार, २०२२ मध्ये गुरुमाऊलींना सामाजिक कल्याणकारी कार्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे दिलेला ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान, जेजुरी संस्थानने दिलेला ‘मल्हारी रत्न’ पुरस्कार आदी विविध पुरस्कार परमपूज्य गुरुमाऊलींच्या कार्याला सन्मानित करतात. ‘ग्राम विकासातूनच देश संपन्न घडू शकतो असे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आज प्रयत्नशील आहेत’ असे गौरवोद्गार भारत सरकारचे गृह व सहकार मंत्री अमितजी शाह यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठात संपन्न झालेल्या सद्गुरू प.पू.मोरदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिलापूजन सोहळ्यात काढले. कीर्तीपासून दूर राहत परमपूज्य गुरुमाऊली आपल्या दिंडोरी येथील कार्यालयातून समाजाची वाटचाल सुयोग्य दिशेने होत राहो यासाठी अथक परिश्रम घेत आहेत