पनवेलमध्ये भाजपला खिंडार; भाजप नगरसेविका लीना गरड यांनी बांधले शिवबंधन

0
185
  • शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पनवेल – पनवेल शहरात भाजपला मोठे खिंडार पडले असून खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लिना गरड यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील शिवसेना भवनात आज, सोमवारी त्यांनी शिवबंधन बांधले. पनवेल शहरात वाढलेल्या इनकमिंगमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढत आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पुढाकाराने भाजपच्या माजी नगरसेविका लिना गरड यांच्यासह उद्योजक मधु पाटील, मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे, शिंदे गटाच्या जानवी घाडगे, भाजप उत्तरप्रदेश सेलचे गजेंद्र सिंग, विनय दुबे, नवीन पनवेल भाजपाचे वार्ड अध्यक्ष तथा पेण तालुका रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र म्हात्रे, समाज सेवक शशिधर माळी, भाजपचे आकाश म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह शेकडो समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क नेते सुभाष देसाई, शिवसेना उपनेते विजय कदम, मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, खारघरचे शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, ग्रामीण विभागप्रमुख दत्ता फडके, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, नवीन पनवेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित