पत्रे उचकटून 13 लाखांची चोरी

0
269

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – कंपनीच्या आवारातील कंपाउंडला लावलेले पत्रे उचकटून अज्ञातांनी 13 लाख 42 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी वल्लभनगर पिंपरी मधील महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स येथे उघडकीस आली.

संजीत देवनारायण कुमार (वय 38, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 4) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वल्लभनगर पिंपरी येथील महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स कंपनीच्या कंपाउंड मध्ये कंपाउंडला लागून पात्रे उभे केले आहेत. त्याच्या आतील बाजूला अॅल्युमिनियम फार्म मटेरियल ठेवले आहे. अज्ञातांनी 26 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते 27 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत पत्रे उचकटून आत प्रवेश करून 13 लाख 42 हजार 410 रुपये किमतीचे अॅल्युमिनियम फार्म मटेरियल चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.