पत्नीस मारहाण केल्याने पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

312

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पत्नीने मुलांना मारले म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री बिजलीनगर, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

संदीप पाटील (वय 31), सासू, सासरे शांताराम पाटील (सर्व रा. बिजलीनगर वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस त्यांची दोन्ही मुले त्रास देत होती, म्हणून त्यांनी मुलांना दोन चापटा मारल्या. यावरून त्यांच्या सासू सासऱ्यांनी फिर्यादीस, तू इथे राहायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली. पती संदीप याला बोलावून घेत सासू सासऱ्यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सांगितले. पतीने फिर्यादीस मारहाण केली. यात फिर्यादींच्या डोक्याला चार टाके पडले. पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत, तुला काय करायचे ते कर असे म्हणून पतीने फिर्यादीस धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.