पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास

46

मोशी, दि. २२ (पीसीबी) – पत्नीसोबत पटत नाही म्हणून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास गंधर्वनगरी, मोशी येथे उघडकीस आली.

शांताबाई शिवराम एळवे (वय 52) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. शिवराम तुकाराम एळवे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम आणि शांताबाई यांचे नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत होते. दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते. शिवराम हे काहीही काम धंदा करीत नव्हते. मागील चार दिवसांपासून ते एका सुरक्षा रक्षक एजन्सीत कामाला जात होते. त्यांना एक मुलगा असून तो एका कंपनीत काम करतो. सकाळी मुलगा कामानिमित्त बाहेर गेला असताना शिवराम आणि शांताबाई यांचा पुन्हा वाद झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलगा घरी आला असता घर आतून बंद होते. मुलाने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मुलाने दरवाजा तोडून आत पाहिले असता शिवराम आणि शांताबाई हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. जवळच दगडी पाटा देखील पडला आहे. शांताबाई यांना दोरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पाट्याने मारून त्यांचा खून केला. शांताबाई यांना मारून शिवराम याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत