पती-पत्नी आरक्षणाच्या उपोषणातून अचानक उठून घरी गेले आणि काही क्षणांत जीवन यात्रा संपवली…!

0
866

बीड, दि. १४ (पीसीबी) : बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर याचे लोण राज्यभर पसरले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नकतेच एका तरुणाने जीवन संपल्याची घटना धाराशीव जिल्ह्यात घडली होती. ही घटना ताजी असतानाच बीडमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे उघडकीस आली आहे. राजु बंडू चव्हाण (वय 31) आणि सोनाली राजु चव्हाण (वय 28) असे मयत दाम्पत्यांचे नाव आहे. जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण सुरू आहे. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते. अचानक उपोषणातून उठले आणि उपोषणस्थळापासून पंधरा फुटाच्या अंतरावर असलेल्या घरी जावून बायकोसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी तलवाडा पोलीस अधिक तपास करत आहे.