‘…पण मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही’, संजय राऊतांच आक्रमक विधान

0
36

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : “मविआला निवडणूका जिंकायच्या आहेत. त्यामुळे दोन-चार जागा मित्र पक्षाने जास्त लढल्या आणि जिंकल्या, तर इतर घटक पक्षांना वाईट वाटण्याचं कारण नाही. विदर्भात काँग्रेस पक्ष सर्वात जास्त जागा लढतोय विदर्भात 64 जागा आहेत. विदर्भात काँग्रेस विषयी एक वेगळी भावना आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा जास्त दिसतात. ज्या भागात जो पक्ष जिंकू शकेल, त्याने तिथे लढायचं असं आम्ही ठरवलं” असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. “निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याआधी एकत्र बसू आणि आमच्या प्रत्येक घटक पक्षाच्या उमेदवाराने अर्ज भरलाय त्याची समजूत काढू. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणं गरजेच आहे. प्रत्येकाला उमेदवारीची इच्छा असते. 288 जागा अलायन्समध्ये कोणालाच लढता येत नाही. विशेष तीन पक्ष एकत्र असतान कार्यकर्त्यांची कुंचबणा होता असते” असं संजय राऊत म्हणाले.

“90 टक्के जागांवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे. उर्वरित जागांवर तिन्ही पक्ष एकत्र बसून, लोकांची नाराची दूर करण्याच प्रयत्न करु. सांगलीचा दाखला लोकांनी विसरायला पाहिजे. तेव्हा एक घटना घडली. त्याची कारण वेगळी होती. सांगली पॅटर्न हा महाराष्ट्राचा लोकप्रिय पॅटर्न नाहीय. एका विशिष्ट व्यवस्थेत निर्माण झालेला तो पॅटर्न आहे. मविआचा काम सर्वांनी एकत्र केलं असतं, तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील नक्कीच विजयी झाले असते. पण मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यामागे काही विशिष्ट कारण असतील. त्यामुळे अपक्ष निवडून आले” असं संजय राऊत म्हणाले.

“सांगलीत काँग्रेसमध्ये सुद्धा बंडखोऱ्या झाल्या आहेत. प्रत्यक्ष सांगलीत पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत. मग सांगली पॅटर्न कोणाचा?. पृथ्वीराज पाटील अधिकृत उमेदवार आहेत. विशाल पाटील यांच्या वहिनी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केलीय” असं संजय राऊत म्हणाले. “मिरजेची जागा शिवसेनेला सुटली. तानाजी सातपुते यांनी अर्ज भरला आहे. भाजपातून आलेल्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, मग कसला सांगली पॅटर्न? हे समजून घेतलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले. “ज्या रोहित पाटील यांनी लोकासभेत विशाल पाटलांच काम केलं. त्यांना सुद्धा अशाच सांगली पॅटर्नचा सामना करावा लागतोय” असं संजय राऊत म्हणाले.