पंतप्रधान मोदी यांच्याकडून आमदार महेश लांडगे यांचे सांत्वन

337

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे देहावसन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार लांडगे यांचे सांत्वन केले असून, शोकसंदेश पाठवला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांचे निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. आज त्यांचा दशक्रिया विधी झाला. गेल्या दहा दिवसांत राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी यांनी लांडगे यांच्या भोसरीतील निवासस्थानी सांत्वन भेट दिली आहे.