पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ‘चहावाला’ म्हणून सुरुवात केली – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

96
गुजरात, दि.२४ (पीसीबी) – गुजरातच्या अहमदाबाद स्थित मोटेरा स्टेडियममध्ये लाखोंच्या उपस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  आणि   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचा एक खास क्षण पाहायला मिळाला. बोलता बोलता मध्येच डोनाल्ड ट्रम्प क्षणभर थांबले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हात मिळवला. नमस्तेम्हणत ट्रम्प यांनी भारतीय जनतेला अभिवादन केले. भारताने दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील, असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. यावेळी, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचंही तोंड भरून कौतुक केले.
पंतप्रधानांनी एक चहावालाम्हणून सुरुवात केली होती. त्यांच्यावर प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते चांगलेच कडक स्वभावाचे आहेत. ते एक टफ नेगोशिएटर आहेत, सेही म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींच्या कौशल्याचंही कौतुक केले. यावेळीच ते क्षणभर थांबले आणि त्यांनी मोदींशी हात मिळवला.