न्यायालय आणि सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगत 15 लाखांची फसवणूक

0
17
187143521

वाकड, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – लखनऊ न्यायालय आणि सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून विविध गुन्हे दाखल असल्याची भीती घालून अनोळखी व्यक्तींनी एका व्यक्तीकडून 15 लाख 74 हजार 688 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना 1 जुलै रोजी थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी थेरगाव येथील 43 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9262064326 क्रमांक धारक अजय मिश्रा, सीबीआय अधिकारी नाव सांगणारा अनोळखी व्यक्ती, सुरेश कोल्ड वॉटर खाते क्रमांक 42765647343 धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस फोन करून तो लखनऊ सत्र न्यायालयातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीवर रावी इन्व्हेस्टमेंट प्रा ली या कंपनीची केस आहे. त्यासाठी तुम्हाला कृष्णा नगर पोलीस ठाणे लखनऊ येथे यावे लागेल, असे सांगितले.

तिथे येणे शक्य नसेल तर टेलिग्राम एप डाउनलोड करून त्यावरून आणखी एका अनोळखी व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवले. फिर्यादीवर मनी लॉड्रिंग आणि अपहरणाचे गुन्हे असून त्यात तुम्हाला अटक करायची आहे. तसेच तुमची मालमत्ता जप्त करायची आहे असे खोटे सांगितले. फिर्यादीस भीती दाखवून अटक आणि इतर कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून एका बँक खात्यावर 15 लाख 74 हजार 688 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.