नोकरी सोडण्यासाठी विवाहितेचा छळ, गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

0
400

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – नोकरी सोड म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ करण्यात आला आहे. त्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 2 फेब्रुवारी रोजी चिंचवड, तानाजीनगर येथे घडली.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी पती निलेश देवराम सरोदे ( रा. चिंचवड) व महिला आरोपी यांना अटक केली आहे. याप्रकरणी मयत मुलीचे वडील सर्जेराव होनाजी तुरुकमारे (वय 64 रा. पिंपरी) यांनी गुरुवारी (दि.22) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 33 वर्षीय मुलीला आरोपी नेकरी सोडण्यावरून तसेच चारित्र्याच्या संशयातून लग्न झाल्यापासून सतत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यांच्या या छळाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.