नेहरूनगर मध्ये अल्पवयीन मुलाकडून शस्त्र जप्त

0
71
crime

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : अमली पदार्थ विरोधी पथकाने नेहरूनगर येथे कारवाई करत एका 17 वर्षीय मुलाकडून पिस्तूल जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) दुपारी एक वाजता पिंपरी न्यायालयाजवळ करण्यात आली.

पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील न्यायालयाजवळ एका अल्पवयीन मुलाकडे पिस्तूल आढळले. अमली पदार्थ विरोधी पथकाने मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.