नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर

0
40

नुकत्याच विद्यापीठाने औषधनिर्माणशास्त्र (बी फार्मसी) च्या सातव्या सत्राचे चे निकाल जाहीर केले. हे निकाल जाहीर करताना लावण्यात आलेल्या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे PRN क्रमांक आणि विद्यार्थ्यांची नावे यामध्ये प्रचंड तफावत आहे. नाव एकाचे आणि PRN नंबर दुसऱ्याचा अशा पद्धतीने यादी लावण्यात आली आहे . त्यामुळे कोणते गुण कोणाचे आहेत हे समजायला अजिबातच मार्ग नाही. यावर विद्यापीठाने खुलासा करण्याचे सोडून पुढील सत्राच्या परीक्षा फॉर्म भरण्याचे पत्रक काढले आहे.

या विद्यापीठाचे गेले काही वर्ष वारंवार ढिसाळ नियोजन समोर येत असून विद्यार्थ्यांना भेटीस धरले जात आहे. याबाबत आम्ही अनेक वेळा निवेदने दिली आहेत, आंदोलने केली आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासन सुधारायला तयार नाही.

सध्या घडलेल्या प्रकरणात विद्यापीठाने योग्य ती कारवाई करून निकाल पुन्हा जाहीर करावेत, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार संघटनेच्या वतीने विद्यापीठाच्या बाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी दिला.