नेरे गावात पावणे सात लाखांची घरफोडी

0
64

नेरे, दि. १९ (पीसीबी) – मुळशी तालुक्यातील नेरे गावात चोरट्यांनी घरफोडी करून सहा लाख 70 हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश दत्तात्रय शिंदे (वय 45, रा. शिंदे वस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम, हॉल आणि स्टोअर रूम मधील कपाट तोडून लॉकर फोडले. त्यातून सहा लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी शिंदे यांच्या शेजारी राहणारे सुनील कैलास गायकवाड यांचे घर देखील फोडले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.