निवृत्तीनंतर आवडते छंद जोपासा – उल्हास जगताप

262

पिंपरी, दि. ३०(पीसीबी) – सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने आणि उत्साहाने जगावे, पर्यटन करावे तसेच आपले आवडते छंद जोपासावेत असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे नोव्हेंबर २०२३ अखेर सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त होणा-या ९ कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, उपलेखापाल अविनाश ढमाले तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये लेखाधिकारी राजू तापकीर, मुख्याध्यापिका रजिया बेगम सय्यद, कार्यालय अधिक्षक राजेंद्र कुंभार, लेखापाल मनोहर सावळे, सुतार पोपट सुर्वे, मजूर अनिल राऊत, रविंद्र भोसले, सफाई सेवक सविता छजलाने तर स्वेच्छा निवृत्त कर्मचा-यांमध्ये उपशिक्षिका सुनंदा माळी यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले