नितेश राणेंचा सरपंचांना दम

0
54

भाजपचे आमदार नितेश राणे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नितेश राणे यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांना दम दिला.

नितेश राणे म्हणाले की, “सरपंचांसह कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावावी. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसा लीड मिळाला नाही, तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र माझी तक्रार करू नका”, असे त्यांनी सांगितले.