नितीनजी बेदमुथा यांना “समाज भूषण” पुरस्कार जाहीर…

148

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – सोशल मीडिया फाउंडेशन व जाज्वल्य वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक किशोरभाई भंडारी यांच्या वतीने निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीनजी फुलचंदजी बेदमुथा यांना “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ पाटीदार भवन गणेश तलाव जवळ प्राधिकरण निगडी येथे होणाऱ्या शानदार सन्मान सोहळ्यास निवर्तमान अध्यक्ष जैन कॉन्फरन्स दिल्लीचे पारसजी मोदी यांच्या आणि अनेक प्रमुख मान्यवरांच्या शुभास्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पिंपरी चिंचवडचे नेते सोशल मीडिया सोशल मीडीया फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष किशोरजी भंडारी, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, जैन प्रा. कॉन्फरन्स ट्रस्ट बोर्ड चेअरमन, उद्योजक रमणलालजी लुंकड, जैन श्रावक संघ अध्यक्ष थेरगावचे मोहन लालजी संचेती, सौ. वर्षा किशोरजी टाटियाजैन कॉन्फरन्स दिल्ली पंचम झोन महिला अध्यक्ष या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.