निघोजे आणि कुरुळी गावात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी दोन कारवाया

0
66

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी निघोजे आणि कुरुळी येथे दोन कारवाया करण्यात आल्या. या दोन्ही कारवाया गुरुवारी (दि. 23) सायंकाळी केल्या आहेत.

पहिली कारवाई निघोजे गावात स्मशानभूमी जवळ करण्यात आली. नारायण बाबूसिंग जाधव (वय 35, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. बुलढाणा) हा धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करत होता. मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये तो गॅस काढत असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून 13 हलर 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई कुरुळी गावात करण्यात आली. कुरुळी गावात कुरुळी फाटा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अजय गोविंदराव मोरे (वय 24, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. लातूर) याने बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत 11 हजार 750 रुपये किमतीचे साहित्य जप्त करत गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.