निगडी, यमुनानगर परिसरात गढूळ पाणी, मनसेचे धरणे आंदोलन

0
135

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक 13 निगडी, यमुनानगर परिसरात गेले अनेक दिवसापासून गढूळ पाणी येते आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी प्रभाग कार्यालयात धाव घेतली असता संबंधीत अधिकाऱ्याने पलायन केल्याने मनसेने कार्यालयातच तीन तास धरणे आंदोलन केले. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी नेतृत्व केले होते.

यमुनानगर स्किम नंबर 9 व निगडी वसाहत या ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होतो. गेले सात महिने असाच प्रकार सुरू आहे. या प्रकऱणात पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असता दाद देत नाहीत, असे नागरिकांनी सांगितले. संबंधित अधिकारी जिंतिकर व बाविस्कर त्याचप्रमाणे गिरी मॅडम यांना वेळोवेळी कळविले आणि पत्रव्यहार करण्यात आला. पालिका अधिकारी व प्रशासन यांनी दुर्लक्ष केले. वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा नागरिकांना कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याविषयी तक्रारी पुढे येत आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी आज फ प्रभागात कार्यालयात चिखले आणि नागरिकांनी धाव घेतली. संबंधीत अधिकाऱ्यांनी अक्षरशः काढता पाय घेतला आणि निघून गेले. या घटनेचा मनसेनेनिषेध केला आणि सलग तीन तास धरणे आंदोलन केले.

मनोज लाडगे, रोहीत काळभोर , विवेक गवळी आदी मनसे कार्यकत्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, संबंधीत अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांना काळे फासण्याचा इशार मनसेने दिला आहे.