निगडी, दिघी, वाकड मधून पावणे आठ लाखांचा ऐवज चोरीला

49

निगडी, दि. १७ (पीसीबी) – निगडी प्राधिकरणात घरफोडी करून सहा लाख 90 हजरांचे दागिने, घड्याळ, मॅगझीन चौक दिघी येथे फळगाडीवरून ग्राहकाचा 65 हजारांचा मोबाईल फोन तर थेरगाव गावठाणातून 20 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. या तिन्ही प्रकरणी शुक्रवारी (दि. 16) निगडी, दिघी आणि वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निगडी प्राधिकरणातील घरफोडी प्रकरणी महिलेने दोन चोरट्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागील किचनच्या खिडकीचे ग्रील काढून त्यावाटे घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटातून सोन्याचे, मोत्याचे दागिने आणि दोन महागडी घड्याळे असा सहा लाख 90 हजरांचा माल चोरून नेला.

दिघी येथील चोरी प्रकरणी नवाबचांद शेख (वय 51, रा. भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुरुवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजता मॅगझीन चौक, दिघी येथे फळे घेण्यासाठी गेले होते. ते एका गाड्यावर फळे घेत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल फोन गाड्यावर ठेवला. त्यावेळी त्यांची नजर चुकवून चोरट्याने फिर्यादी यांचा 65 हजरांचा मोबाईल फोन चोरून नेला.

दिनकर महादू जाधव (वय 52, रा. थेरगाव गावठाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. तिथून त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 15) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला.