निगडीत योग दिन उत्साहात साजरा..

28

पिंपरी दि. २१ (पीसीबी)- प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक व श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित योग दिनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत योगासने केली. निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करण्याचे आवाहन माजी नगरसेवक अमित गावडे यांनी उपस्थितांना केले.

सेक्टर नंबर 26 येथील रमादेवी सदाशिव वर्टी सभागृहात सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत योगासने करण्यात आली. योगाचार्य डॉ. अजित जगताप, शिक्षिका विना पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी योगाभ्यास, योगसाधाना व प्राणायाम सादर केले. योग  माजी नगरसेवक अमित गावडे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा चांदबी सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित गावडे म्हणाले, ”योगसनांमुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. योगासने करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करणे गरजेचे आहे”.  

डॉ. शुभांगी म्हेत्रे, चंद्रशेखर जोशी आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने आयोजनात पुढाकार घेतला होता. सूत्रसंचालन अर्चना वर्टीकर यांनी केले. तर, चांदबी सय्यद यांनी आभार मानले.