निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण …

0
77

दि. 15 (पीसीबी) – बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरु असून या आठवड्यात जोरदार कल्ला पाहायला मिळालेला आहे. बिग बॉसच्या घरात हिंसेचा वापर करत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. त्यानंतर आता शोवर प्रेक्षकांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. या दोघींमधील भांडण इतकं टोकाला पोहोचल्यानंतर आर्याने थेट निक्कीच्या कानाखाली पेटवली. यानंतर बिग बॉसच्या घरातील आदेश मोडल्यामुळे बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं, त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्याचं फुटेल टीव्हीवर दाखवण्यात आलेलं नाही.

दरम्यान, आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्याचा व्हिडीओ दाखवा अशी मागणी बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. आर्याने निक्कीला कानाखाली मारली की नाही, हे आम्हालाही कळू दे फुटेज दाखवा, अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं सांगितलं की, लहान मुलेही शो पाहत असल्यामुळे आर्याने निक्कीला मारल्याचं फुटेज दाखवता येणार नसल्याचं म्हटलं.

आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याचं फुटेल नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवता येणार नाही, असं रितेश भाऊनं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण आर्याने मारलेलं दाखवू शकतं नाही, असं म्हणत प्रेक्षक बिग बॉसवर रोष व्यक्त करताना दिसत आहेत. आर्याला घराबाहेर काढल्याचा निर्णय बिग बॉस प्रेमींना पटलेला नाही. प्रेक्षकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

बिग बॉस मराठीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “आर्याला शिक्षा झाली पण तिने निक्कीला कानाखाली मारलेली जनतेला दाखवले नाही, कारण लहान मुले हा शो बघतात, असे कारण सांगितले. पण, निक्की आणि अरबाजचे चाळे लहान मुले पाहात असतात तेव्हा त्यांच्यावर परिणाम होत नाही का? त्यांना का नाही ताकीद दिली, हा प्रश्न जनतेला पडला आहे.” दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, ते फुटेज दाखवू शकत नाही कारण, लहान मुले पाहतात अणि निक्की अरबाज जे करत असतात ते मुलांनी पाहण्यासारखे आहे का? असा सवाल विचारला आहे.