नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री गणेश मूर्तीदान संकलनात १३ हजार सातशे वीस गणेशमूर्तीचे संकलन

0
206

पिंपळे सौदागर, दि. २९ (पीसीबी) – पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्याषी प्रमाणे २०२३ या वर्षी देखील मूर्ती दान हा संकल्प घेण्यात आला. होता या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आव्हान मा. विरोधीपक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व शितलताई नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले

मागील ५ वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर,परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे दीड दिवसांचे \ ते १० दिवसांचे गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित न करता, ते दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे व शितलताई नाना काटे व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला पिंपरी,रहाटणी, पिंपळे सौदागर गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात घरगुती व सार्वजनिक असे एकूण १३ हजार ७०० मूर्ती दान करण्यात आल्या.

मागीलवर्षी २०२२ या उपक्रमात १० हजाराहून जास्त गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. हे मूर्ती संकलन करण्याचे काम श्री फाउडेशन, यांचा वतीने करण्यात आले
या उपक्रमात नगरसेवक नाना काटे व शितलताई नाना काटे हे स्वतः विसर्जन घाटावर उपस्तीत राहून आवाहन करत होते त्याबरोबर नाना काटे सोशल फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी, विविध
संस्थाच्या स्वयंसेवकांनी भाविकाना मूर्तीदान व निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते.