नागरिकांच्या करातुन जमलेल्या निधीचा व्यर्थ खर्च महानगरपालिकेला करू देणार नाही – सचिन काळभोर

0
136

दि 2 एप्रिल (पीसीबी )- लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आमदाराचा चमकोगीरीचा प्रयत्न

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार असून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरीत शिल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मीडिया च्या माध्यामातून प्रसारीत होत आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र व भोसरी गावजत्रा मैदान परिसरात येथे ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे काम हाती घेण्यात आले आहे. त्याला भाजपाच्याच शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी विरोध दर्शविला असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महानगरपालिकेने नागरिकांकडुन कर स्वरुपात जमवलेला पैसा व्यर्थ खर्च केला जात आहे. त्यातुन लोक उपयोगी कल्याणकारी योजना राबविणे सोडून फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चमकोगीरी करण्याचा खटाटोप भोसरीचे आमदार महेश लांडगे करत आहेत. या सर्व बाबींचा भोसरी विधानसभेतील नागरिकांना काहीही फायदा होणार नाही. मोशीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाचे काम ७०% पूर्ण झाले असताना शिल्पाचे स्थलांतर करण्याचा घाट याच आमदाराकडून घातला गेला त्यातून महानगरपालिकेने नागरिकांकडुन कररुपी जमवलेल्या करोडो रुपयांचा निधी व्यर्थ केला गेला.भोसरी विधानसभा मतदार संघातील महत्त्वाचा रेड झोनचा प्रश्ण ऐरणीवर असताना विनाकारण भंपकगिरी आमदार करत आहेत. असा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे. आचारसंहिता लागु असताना न्यूज पोर्टल आणि सोशल मीडिया च्या माध्यामातून अश्या प्रकारच्या माहिती प्रसारित करून आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.