नवी सांगवीत घरातून तीन लॅपटॉप चोरीला

167

सांगवी, दि. २८ (पीसीबी) – चोरट्यांनी घरातून दीड लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी ढोरे पाटील फार्म, नवी सांगवी येथे उघडकीस आली.

गौरव रामचंद्र जाधव (वय 25,र आ. ढोरे पाटील फार्म, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा सोमवारी (दि. 26) रात्री साडेदहा ते मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत उघडा होता. त्यावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातून दीड लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप आणि लॅपटॉप चार्जर चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.