नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने 3000 राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप….

274

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने पिंपरी प्रभाग क्रमांक 21 व पिंपरी परिसरातील नागरिकांना नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने मोफत 3000 राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्धापन दिन निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकांनी घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील 20 कोटी होऊन अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे सदर अभियान यशस्वीरित्या राबविणे कामे पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांना जनसंपर्क कार्यालय येथे 3000 मोफत राष्ट्रध्वज यांचे वाटप करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम निश्चितपणे यशस्वी ठरणार आहे असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला याप्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने बीजेपी वार्ड अध्यक्ष जयेश चौधरी मदन गोयल गणेश ढाकणे नितीन अमृतकर अनिताताई वाळुंजकर यांनी प्रभागांमध्ये राष्ट्रध्वजाचे वाटप केले.