ध्वजारोहण आणि गुणगौरव सोहळा संपन्न

117

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी वीर हनुमान मंदिर, स्पाइन रोड, शरदनगर येथे स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानने ध्वजारोहण तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, डॉ. श्वेता पंडित, सचिन सानप, देवराम मेदनकर, महादेव कवितके, डॉ. विजय भळगट, नीलेश नेवाळे, संतोष ठाकूर, बाजीराव सातपुते, सिद्धाराम मालगट्टी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे, उत्तम तेलंगे, शंकर बनकर, मिलिंद वेल्हाळ, माजी सैनिक चौधरी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभातफेरीतून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘भारतमाता की जय’ , ‘वंदेमातरम्’ , ‘जय हिंद’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

त्यानंतर विश्वास सोहनी यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्याचे तंत्र तसेच स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. संतोष ठाकूर यांच्या वतीने सुमारे एकशेतीस गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. तसेच ‘प्रतिष्ठित’ तर्फे दत्तक विद्यार्थी योजनेचे आयोजन करण्यात आले. महेश मांडवकर, श्रेणिक पंडित, सुनील खंडाळकर, मोहन सावरे, बाप्पू साळोखे, जयसिंग भोसले, शंकर मालगट्टी आणि स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. दत्ता पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. अशोक हडके यांनी आभार मानले.