धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपला राम राम

0
218

अखेर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती स्पष्ट झाली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर आपला निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यामध्ये म्हटले आहे. माढा मतदारसंघात भाजप आघाडीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात महाआघाडीतून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, मोहिते यांच्या बाजुने बड्या नेत्यांची फौज असल्याने निंंबाळकर यांचे धाबे दणानले आहेत.