धनेश पक्ष्यांसाठी फायकास ची झाडे उद्यानांमध्ये, मोकळ्या जागांवर लावा

0
105

धनेश पक्ष्यांसाठी फायकास ची झाडे उद्यानांमध्ये, मोकळ्या जागांवर लावा, अशी मागणी निसर्गप्रेमी धनंजय शेडबाळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

निवेदनात ते म्हणतात,
ग्रे हॉर्नबिल/धनेश हा मोठा, देखणा पक्षी आपल्या शहरात आहे. त्यांच्या संवर्धनाकरिता सर्व सर्व प्रकारचे Ficus आपल्या उद्यानांमध्ये, मोकळ्या जागांवर लावावेत. ते लावण्यासाठी आम्ही संस्था, नागरिक नक्कीच मनपाला मदत करू. रोपे कुठे मिळतात आणि कशी लावायची हे सांगू. पण ह्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात यांची लागवड करावी, पक्षीवैभव वाढवावे, कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून घेण्यासाठी भंडारे निर्मावित आणि नागरिकांना सावली आणि नेत्रदीपक परिसर निर्माण करावा अशी विनंती केली आहे.

Ficus amplissima/पिपरी,
Ficus arnottiana/पायर,
Ficus callosa,
Ficus drupacea/बुरली वड,
Ficus exasperata/खरवत,
Ficus hispida/काळा उंबर,
Ficus microcarpa/नांदरुक,
Ficus nervosa/लोथ,
Ficus rumphii/आष्टा,
Ficus talbotti,
Ficus tinctoria, दातिर,
Ficus tsjahela/केल,
Ficus virens/पायर.

थोडक्यात वड पिंपळ उंबर यांच्या पलीकडे असणारी ficus ह्या keystone species ची जैवविविधता वाढवू या.