धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने तरुणीचे नग्न फोटो व्हायरल

0
282

दिघी, दि. २९ (पीसीबी) – सोबत राहण्यास आणि लग्नास नकार दिल्याने तरुणीचे नग्न फोटो व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १७ ऑगस्ट २०२२ ते २७ मे २०२३ दरम्यान दिघी येथे घडला. रोहित कांतीलाल भोसले (वय ३४, रा. प्रतिकनगर, कोथरूड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणीने आरोपी रोहित याच्यासोबत राहण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला, शिवीगाळ केली. धमकी दिली आणि मारहाण केली. तसेच नग्न फोटो फिर्यादीच्या बहिणीच्या व्हॉटसॅपवर पाठविले. नग्न फोटो व्हायरल करून फिर्यादीची बदनामी केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.