दोन भावांनी केली रिक्षा चालकास मारहाण

0
429

दोन भावांनी मिळून रिक्षा चालकास सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ८) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.

अतुल अशोक थोरात (वय २७, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय जाधव (वय 27) आणि साई जाधव (वय 18 दोघेही रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी हे काळेवाडी फाटा येथे रिक्षा नंबरला लावून थांबले होते. त्यावेळी आरोपी अक्षय जाधव हा तिथे आला. त्याने फिर्यादीला जवळ बोलावून काय रे लय माज आला आहे काय? आमच्या नादी लागतो काय? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी याने काय झाले भाऊ ते बोलू आपण, असे म्हटले. त्यावेळी आरोपीने आपला भाऊ साई जाधव याला बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून फिर्यादी यांना हाताने व नंतर लाथा बुक्क्याने मारहाण करून सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.