दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

24

रावेत, दि. २७ (पीसीबी) – विरुद्ध दिशेने आलेल्या एका मोपेड दुचाकीने रस्त्याने जाणा-या एका दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यामध्ये रस्त्याने जाणा-या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर सहप्रवासी जखमी झाला आहे. हा अपघात 23 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुकाई चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये घडला.

छटीराम भुसैलीप्रसाद वर्मा (वय 27, रा. रावेत. मूळ रा. बलरामपूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मेवालाल गुरई भारती (वय 31, रा. रावेत. मूळ रा. बलरामपूर, उत्तरप्रदेश) असे जखमी सहप्रवाशाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल लक्ष्मण तुरणकर (रा. रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र 23 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुकाई चौकाजवळ बीआरटी रोडने जात होते. त्यावेळी आरोपी विरुद्ध दिशेने मोपेड दुचाकीवरून आला. त्याने छटीराम चालवत असलेल्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात छटीराम यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी मेवालाल जखमी झाले. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare