दोन दुकाने फोडून कपडे, चॉकलेट, कॅडबरी, कोल्ड्रिंक चोरीला

30

काळेवाडी, दि. ८ (पीसीबी) – काळेवाडी येथे दोन दुकाने फोडून चोरट्यांनी कपडे, चॉकलेट, कॅडबरी, कोल्ड्रिंक आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 7) सकाळी समृद्धी हाइट्स काळेवाडी येथे उघडकीस आली.

नवनाथ रघुनाथ माळी (वय 33, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माळी यांचे समृद्धी हाइट्स येथे कपड्याचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. काउंटर मध्ये ठेवलेले 14 हजार रुपये, तसेच दुकानातील ट्रॅक पॅन्ट, बनियान, शर्टचे बॉक्स आणि बल्ब असे दहा हजारांच्या वस्तू चोरल्या. त्यानंतर माळी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेले सुरेखा गोरक्ष टिळेकर यांचे जय मल्हार आईस्क्रीम पार्लर हे दुकान देखील चोरट्यांनी फोडले. दुकानातून चॉकलेट, कॅडबरी, कोल्ड्रिंक आणि दोन हजार रुपये रोख रक्कम चोरली. दोन्ही दुकानांमधून चोरट्यांनी एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.