दोन कुटुंबामध्ये वाद; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
156

तरुणी इतर व्यक्ती सोबत फिरत असल्याच्या रागातून तरुणाने तिच्याशी भांडण केले. यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी जोशीवाडा, तळेगाव दाभाडे येथे घडली.

राहुल सावळेराम पिंगळे (वय 31, रा. जोशीवाडा, तळेगाव दाभाडे) त्याचे आई आणि वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याला फिर्यादी सोबत लग्न करायचे होते. दरम्यान फिर्यादी इतर व्यक्तीसोबत फिरताना त्याने पाहिले. त्या कारणावरून राहुल आणि फिर्यादी यांचे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी आणि तिचे नातेवाईक राहुल याच्या घरी आले. त्याला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी देत फिर्यादी सोबत गैरवर्तन करून विनयभंग केला.

याच्या परस्पर विरोधात राहुल पिंगळे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार 19 वर्षीय तरुणी आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि राहुल यांचे भांडण झालेले असताना आरोपी दोन दुचाकीवरून राहुल यांच्या घरी आले. त्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेस करून राहुल यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वाहनाची व घरातील साहित्याची तोडफोड करत 40 हजारांचे नुकसान केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.