देशी बनावटीच्या कट्ट्यासह तरुणाला महाळुंगे येथून अटक

0
291

महाळुंगे, दि. २१ (पीसीबी) : बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी महाळुंगे ताखेड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश राजेंद्र गायकवाड यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर हरिनाारायण कडू (वय 28 रा.महाळुंगे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी असताना देखील आरोपी हा त्याच्या ताब्यात 10 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल घेवून फिरत होता. पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून शस्त्रासह अटक केली आहे. यावरून महाळुंगे पोलिसांनी त्याला अटक करत पोलीस पुढील तपास करत आहेत.