देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक

0
190

मामुर्डी ,दि.२२(पीसीबी) – दुचाकीवरून देशी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६३ हजरांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि. २१) सायंकाळी सव्वापाच वाजता मारुंजी येथे करण्यात आली.

सौरभ मोहन नायर (वय ३१, रा. मामुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मितेश यादव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या दुचाकीवरून टॅंगो पंच देशी दारूची वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून ६३ हजार ५०० रुपये किमतीचा देशी दारूचा बॉक्स जप्त केला. त्याने हा बॉक्स मारुंजी येथील प्रथमेश वाईन शॉप मधून आणला असल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.