देशात भ्रष्टाचार ५४ टक्केनी वाढला

0
129

दि १४ एप्रिल (पीसीबी )- भ्रष्टाचाराचा भस्मासुर भारतात मोठ्या प्रमाणात फोफावत असून जगाच्या तुलनेत भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण दुपटीने वाढत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. प्रत्येक दुस-या व्यक्तीने आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी लाच द्यावी लागली, अशी कबुली यात नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार संपविण्याची भाषा करत असले तरी वास्तवार गेल्या वर्षभरात ५४ टक्के भ्रष्टाचार वाढल्याचे पाहणीत आढळले.
ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-2013 द्वारा मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जगातील 27 टक्के लोकांनी मागील 12 महिन्यांत लाच दिली आहे तर याबाबतीत भारत मात्र जगाच्या बराच पुढे आहे. भारतात हे प्रमाण 54 टक्के आहे. म्हणजेच भारताच्या प्रत्येक दुस-या व्यक्तीने लाच दिल्याचे मान्य केले आहे. 107 देशांतील 1.14 लाख लोकांच्या या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. त्यांना भ्रष्टाचाराशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते.
भ्रष्टाचाराबाबत राजकीय पक्ष आघाडीवर असून सर्वेक्षणात त्यांना 5 पैकी 4.4 गुण मिळाले आहेत. भ्रष्टाचार मुक्तीसाठी अनेक उपाय योजिले जात आहेत, परंतु देशातील 45 % नागरिकांना असे वाटते की, सामान्य नागरिकाने काही केल्याने यात काहीच फरक पडणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे,
भ्रष्टाचाराची तक्रारच करत नसल्याचे 34 टक्के लोकांनी कबूल केले आहे. भारतातील प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक जण भ्रष्टाचाराची तक्रारच करत नाही.

भारतीयांच्या मते कोण किती भ्रष्ट (टक्केवारीमध्ये)
62% पोलिस
48% शिक्षण संस्था
61% नोंदणी आणि परवाना
नागरी सेवा 38%
36% न्यायपालिका

विविध देशांतील स्थिती
36 देशांमध्ये पोलिस सर्वाधिक भ्रष्ट.
17 देशांत (जी-20) 59 % लोकांना सरकार भ्रष्टाचाराविरोधात लढत नसल्याचे वाटते.
20 देशांत न्यायपालिका सर्वाधिक भ्रष्ट.
51 देशांत नागरिकांची राजकीय पक्ष सर्वाधिक भ्रष्ट (55 %) असल्याची कबुली.