देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पुणेरी स्टाईलने विनंती

0
185

पुणे, दि. १८ (पीसीबी) – राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदार यांनी सत्तेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना खरी कोणाची हा वाद समोर आला त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना ही नाव आणि पक्षचिन्हं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. परंतु यासंबधीचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. दोन्ही गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले असून सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तर पुण्यात याच पार्श्वभूमीवर पोस्टर झळकले आहेत.

सत्तासंघर्षाची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचा खंडपीठाकडे सुरु होती. ही सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला. परंतु या प्रकरणात पुणे शहरात बॅनर लावण्यात आले आहे. त्यातून देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पुणेरी स्टाईलने विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून न्यायाधीशांना बॅनर मार्फत विनंती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लावलेल्या या बॅनरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लोकशाही वाचवण्यासाठी विनंती देखील केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल न्यायाच्या बाजूने द्या, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हंटलं आहे. सध्या शहरात हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.