देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नारद मुनी – रविकांत वरपे

0
93

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सांगातात सागर बंगला हा सरकारी असल्याने सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकते.

देवेंद्र फडणवीसजी याच सागर बंगल्याचा उपयोग आज महाराष्ट्र धर्माचे नुकसान करण्यासाठी, राज्य अस्थिर करण्यासाठी कपट छळ करण्यासाठी, राजकीय घरे फोडण्यासाठी होत आहे.

आपले महाराष्ट्र राज्य सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन जाणारे राज्य आहे . महाराष्ट्र धर्माची मोठी परंपरा या राज्याला आहे. तो महाराष्ट्र धर्म तोडण्याचे जाती व धर्मात द्वेष निर्माण करण्याचे काम सागर बंगल्यावरून होत आहे असे आज महाराष्ट्र जाणतो.

आपल्या ल राज्यच्या मुख्यमंत्री महोदयांचे वर्षा निवस्थान हे एकेकाळी महराष्ट्रातील विकास, समृद्धी व प्रगतीचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. आज त्याच वर्षा बंगल्याने सागर बंगल्या पुढे आता गुढघे टेकले आहेत. सागर बंगला हा गुन्हेगार व गुंड लोकांचे आश्रयस्थान देणारे ठिकाण बनला आहे.

सत्ताधारी भाजपचे आमदार बोलत आहे की सागर बंगल्यावर आमचा बाप बसला आहे सागर बंगल्यावर राहणार बाप कोण आहे ? जो सागर बांगला गुन्हेगार, गुंड आणि शिवीगाळ करणाऱ्या, महाराष्ट्र धर्म तोडणाऱ्या लोकांना खुलेआम अभय देतो .

राज्यात कळीचे नारद मुनी कोण असतील तर ते खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सरकारी निवासस्थान समृद्धी, विकास, प्रगतीचे पाहिजे.. कट, कारस्थान, कपट रचणाऱ्याचे नाही.

  • रविकांत संभाजीराव वरपे
    प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथा युवक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार